salary

आता खासदारांना 1 लाखाऐवजी 1.24 लाख रुपये वेतन मिळणार आहे. वेतनासोबतच सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यांमध्येही वाढ केली आहे. खासदारांच्या दैनंदिन भत्त्यात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, दैनंदिन भत्ता आता 2000 रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही नवीन वेतन वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू असेल.

खासदारांच्या पगारात 5 वर्षांनंतर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही पगारवाढ 1 एप्रिल 2023 पासूनच लागू होईल. या निर्णयापूर्वी खासदारांचे पेन्शन 25 हजार रुपये होते, ते आता 31 हजार रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन किंवा तीन वेळा खासदार राहिलेल्यांचे अतिरिक्त पेन्शन 2000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आले आहे. हा बदल संसद सदस्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन अधिनियम, 1954 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून करण्यात आला आहे, तर आयकर कायदा, 1961 मध्ये निर्दिष्ट केलेल्या महागाई निर्देशांकावर आधारित आहे.