नमो किसान 2000 रुपये गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव पहा

Namo kisan scheme नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी शेतकरी वाट पाहत होते. अखेर, महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे.

 

नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव

 

नमो योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. याबद्दलचा सरकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने २६ जून रोजी जाहीर केला आहे.

  • २०२३ च्या अर्थसंकल्पात, महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेतून, शेतकऱ्यांना वर्षाला तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. म्हणजे, दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात. या योजनेतून आतापर्यंत पाच हप्ते वाटण्यात आले आहेत.

 

नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव

 

  • पाचवा हप्ता, विधानसभा निवडणुकीच्या आधी परळी येथील एका कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत वाटण्यात आला होता. त्यावेळी, घाईघाईत कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आणि दोन दिवसांत पैसे वाटल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे, अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, असा शेतकऱ्यांनी आरोप केला.
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (पीएम किसान) लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत. राज्यात पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ९२ लाख ८० हजार आहे. पीएम किसानचा हप्ता वाटल्यानंतर, त्याच यादीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.

 

नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव

 

  • नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात नमोच्या हप्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. पीएम किसान आणि नमोचा वार्षिक मदत निधी १५ हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे, शेतकऱ्यांना वर्षाला तीन हजार रुपये जास्त मिळतील, अशी अपेक्षा आहे.
  • राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी तरतूद केली जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला, पण या अर्थसंकल्पात नमोच्या वाढीव निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Leave a Comment