MP Salary And Pension : केंद्र सरकारने खासदारांचे मासिक वेतन, दैनंदिन भत्ता आणि पेन्शन वाढवली आहे. केंद्र सरकारने सोमवारी (24 मार्च 2025) खासदारांच्या पगारात भरघोस वाढ जाहीर केली. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदारांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये खासदार आणि माजी खासदारांना मिळणाऱ्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा जाहीर करण्यात आल्या होत्या.
खासदारांना भरघोस वेतनवाढ, आता किती वेतन मिळेल?
2018 मध्ये दुरुस्तीत जाहीर झालेल्या खासदारांसाठी मूळ वेतन 1,00,000 रुपये प्रति महिना होते. 2018 च्या दुरुस्तीनुसार खासदारांना त्यांची कार्यालये अद्ययावत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जिल्ह्यातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी मतदारसंघ भत्ता म्हणून 70,000 रुपये मिळतात.
याशिवाय त्यांना दरमहा 60,000 रुपये कार्यालय भत्ता आणि संसदेच्या अधिवेशनात 2,000 रुपये दैनिक भत्ता मिळतो. या भत्त्यांमध्येही आता वाढ करण्यात येणार आहे.
खासदारांना भरघोस वेतनवाढ, आता किती वेतन मिळेल?
याशिवाय खासदारांना फोन आणि इंटरनेट वापरासाठी वार्षिक भत्ताही मिळतो. यासोबतच, खासदार आणि त्यांच्या कुटुंबासाठी दरवर्षी 34 मोफत देशांतर्गत उड्डाणे आणि कोणत्याही वेळी प्रथम श्रेणी ट्रेन प्रवासाची सुविधा मिळते. तसेच, खासदारांना 50,000 मोफत वीज युनिट आणि 4,000 किलोलिटर पाण्याचा वार्षिक लाभ देखील मिळतो. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही सरकार करते.