Land Map Records Online नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता या लेखांमध्ये आपल्या शेती विषयी जो आपल्या शेत जमिनीचा नकाशा असतो हा ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर कसा पाहू शकता याची संपूर्ण माहिती येथे आपण पाहूया आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाने आपल्या जमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहेत.
जर तुम्हाला कधी शेतात जाण्यासाठी रस्ता बनवायचा असेल किंवा जमिनीचे हद्द पाहिजे असेल.
या अशा सर्व गोष्टींसाठी आपल्याला जमिनीचा नकाशा ची गरज भासते आणि हा नकाशा राज्य शासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने फक्त तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकून एक मिनिटांमध्ये पाहू शकता तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
तुमच्या जमिनीचा नकाशा मोबाईलवरून फक्त गट नंबर टाकून ऑनलाईन पद्धतीने कसा पहायचा? खालील स्टेप नुसार पहा :-
सर्वात आधी तुम्हाला ऑनलाईन नकाशा पाहण्यासाठी महाभूमिलेखच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा.
फक्त गट नंबर टाकून 1 मिनिटात पहा जमिनीचा नकाशा
या लिंक वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला जमिनीचा नकाशा पहा त्याखाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा.
आता महाराष्ट्र शासनाची महाभुमिअभिलेखाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
ही साईट ओपन झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला क्रोम च्या उजव्या वरच्या साईटला जे तीन टिंब दिसत आहेत त्यावर जाऊन सेटिंग मधून डेस्कटॉप मोड चालू करायचा आहे.
आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाव्या साईटच्या वरच्या साईडला तीन रेषा दिसत असतील ते रेषेवर क्लिक करा.
त्या तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे आणि याच बरोबर तुमच्या जमिनीचा गट नंबर हा टाकायचा आहे.
आता हा जिल्हा तालुका गाव याचबरोबर जो आपण गट नंबर टाकतो किंवा तिथे तुम्ही खाली जाऊन पर्याय उपलब्ध असतो तिथे तुम्ही तुमचा गट नंबर सिलेक्ट सुद्धा करू शकता.
हे सिलेक्ट करताना प्रत्येक ऑप्शन सिलेक्ट करताना पहिला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी थोडा वेळ थांबा कारण की तुमच्या जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील तालुके हे लोड होण्यासाठी थोडा टाईम लागतो.
त्यामुळे एक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खालचे ऑप्शन साठी दहा ते पंधरा सेकंद थोडा वेळ थांबत जा जेणेकरून तुमचा खालचा पर्याय लोड होऊन तुम्ही तुमचा खालच्या पर्यायातील तुमचा तालुका किंवा गाव निवडू शकता त्यानंतर तुमचा गट नंबर टाकून झाला की तुम्हाला तुमच्या गट नंबरची संपूर्ण नकाशा उजव्या साईडला पाहायला मिळेल यानंतर खाली तुम्हाला मॅप रिपोर्ट(Map Report) नाव असे छोटे अक्षरात दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा हा नकाशा डाऊनलोड सुद्धा करू शकता.