Ladki Bahin Yojana Good News मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 3000 हजार रुपये मिळणार?

Ladki Bahin Yojana Good News : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकूण 9 हाफ्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती.

 

➡️ शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! करा हे काम

 

दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आली. मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही दीड हजार रुपयेच देण्यात येत आहेत. 2100 रुपये कधीपासून मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र तुर्तास तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

 

➡️ ‘लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये’ एकनाथ शिंदेंकडून सर्वात मोठी बातमी

 

लाडकी बहीण योजना सुरुच राहाणार आहे, या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. 2100 काय तीन हजार रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागेल.

मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, 2100 नाही तर तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबावं लागणार आहे. आमच्या लाडक्या बहि‍णींचा आमच्यावर विश्वास आहे.

त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत, 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत, आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतशे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3000 हजार रुपये देऊ, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे Ladki Bahin Yojana Good News.

Leave a Comment