Ladaka Shetkari Yojana : विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादनातील अन्यायाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठे समाधान व्यक्त केले. २००६-२०१३ च्या काळातील अन्यायाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या किंमतीच्या पाचपट मोबदला मिळणार आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार देणार इथे
“विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे. याचा मला आज खूप आनंद आहे. शेतकऱ्यांसाठी जमीन ही आईप्रमाणे असते आणि ती जाताना मोठे दुःख होते. २००६ ते २०१३ या काळात विदर्भातील शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने फसवणूक झाली, ती अत्यंत वेदनादायक आहे. तत्कालीन सरकारने थेट खरेदी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रे घेतली. त्यांचे सर्व हक्क गोठवण्याचे काम केले. जर शेतकऱ्यांना योग्य वाढीव किंमत दिली असती, तर ते मान्य होते, परंतु त्यांना कमी भाव देऊन त्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले”, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते अमरावतीत बोलत होते.
प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार देणार इथे
“मुख्यमंत्री झाल्यावर मी तातडीने निर्णय घेतला. शेतकऱ्यांची जमीन थेट खरेदी करायची असल्यास शेतकऱ्यांना जमिनीच्या किंमतीच्या ५ पट पैसे द्यावे लागतील, असा शासन निर्णय (जीआर) काढला. तीन वर्षांपूर्वी ज्या जमिनीची किंमत लाख रुपये होती, ती आता १८ लाखांवर गेली आहे. बळीराजा संघर्ष समितीने यासाठी मोठा लढा उभारला होता. दुर्दैवाने आपले सरकार गेल्यानंतर, ज्यांनी २००६ ते २०१३ मध्ये शेतकऱ्यांना फसविले, त्यांचेच सरकार पुन्हा आले. त्यामुळे मोठे आंदोलन झाले, परंतु सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनीही यात काही करता येत नसल्याचे सांगितले.
प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार देणार इथे
कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत काहीही करता येत नाही, असे दिसत होते. प्रतापदादा रोज भेटून काहीतरी मार्ग काढण्याची विनंती करत होते. त्यानंतर आम्ही विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवले आणि राज्याच्या महाधिवक्त्यांशी (ॲडव्होकेट जनरल) चर्चा केली. सरकारी पैसा खर्च करताना कायदेशीर बाजू तपासणे अत्यंत गरजेचे असते”, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
‘कायदेशीर वाट नाही म्हणून अन्याय सहन करायचा, हे योग्य नाही.’ जलसंपदा अधिकाऱ्यांनीही कणखर भूमिका घेतली. विदर्भात नेहमीच असा अन्याय का होतो, याची मला खंत वाटत होती आणि याच वेदनेतून आपण काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे की, अन्याय करणारा कायदा बदलला पाहिजे. सर्वात आधी शेतकऱ्यांना चेक देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी आपले ओझे हलके झाल्याची भावना व्यक्त केली. जराड साहेब यांनी दिलेली मिठी ही हार-तुऱ्यांपेक्षा अधिक महत्त्वाची होती, असे फडणवीस म्हणाले.