‘आईने 25 रुपये रोजंदारी करत शिकवलं’ गावाकडचा मुलगा झाला, जाणून घ्या यशोगाथा video वायरल

Ips birdev done video viral : “माझं नेहमीच असं म्हणणं असतं की, साध्या माणसाची काय अपेक्षा असते, की त्याला ऐकणारे दोन कान हवे असतात. माझं कुणीतरी ऐकून घ्यावं, असं त्याला वाटत असतं. मी किमान ते कान होईन.”

 

जाणून घ्या यशोगाथा video वायरल

➡️ इथे पहा विडियो ⬅️

“हे ऐकून घेण्यालाच खूप वेळ होतोय, म्हणून फ्रस्ट्रेशन येतंय. तर माझी रिस्पॉन्सिबिलीटी हीच असेल की, मी फर्स्ट रिस्पॉन्डन्ट बनेल. देवानं मला इतकी ताकद अन् बळ द्यावं, की मी त्या सामान्य माणसांचं भलं करु शकेन.”

चेहऱ्यावर आशावादी स्मितहास्य असलेला बिरदेव उत्साहाने सांगत होता. माझ्याआधी कित्येक युट्यूब चॅनेल्सनी आणि टीव्ही चॅनेल्सनी बिरदेवच्या मुलाखती घेतल्या होत्या.

 

जाणून घ्या यशोगाथा video वायरल

➡️ इथे पहा विडियो ⬅️

 

त्या सगळ्यांनाच तो तितक्याच उत्साहाने मुलाखती देत होता. अगदी सदिच्छांसाठी आलेले सगळे फोन कॉल्स उचलण्याला तो प्राधान्य देत होता.

ही सगळी धावपळ सुरू होती बिरदेवच्या बहिणीच्या घर अन् अंगणात. आभाळातून आग ओकत सूर्य माळरानावरची ही धावपळ पाहत होता.

कर्नाटकातलं जोडकुर्ली नावाचं गाव. बिरदेवच्या बहिणीचं छोटंसं घर. या घरानं आणि आजूबाजूच्या परीसरानं एवढ्या चारचाकी गाड्यांची वर्दळ कदाचित कधीच पाहिली नव्हती.

 

जाणून घ्या यशोगाथा video वायरल

➡️ इथे पहा विडियो ⬅️

 

बाहेरच झाडाखाली बांधलेल्या शेळ्या, कोंबड्यांची खुराडं आणि उन्हात एकही क्षण विसावा न घेता लोकांचे सत्कार-समारंभ स्वीकारणारा बिरदेव.

“यूपीएससीचा निकाल लागल्यावर मी ठरवलं होतं की, आधी बहिणीकडंच राहायला जाईन. म्हणून, मी दोन दिवस इथं राहून मगच माझ्या गावी जाणारे,” कित्येक तास बिझी लागल्यानंतर माझा कॉल रिसीव्ह केलेला बिरदेव मला बहिणीचा पत्ता सांगताना म्हणाला.

कागलमधील यमगे गावच्या बिरदेवनं यूपीएससी परीक्षेत 551 वा रँक मिळवला आहे. हा निकाल लागला तेव्हा बिरदेव आपल्या मावशीच्या नवऱ्यासोबत शेळ्या-मेंढ्या घेऊन फिरतीवर होता.

 

जाणून घ्या यशोगाथा video वायरल

➡️ इथे पहा विडियो ⬅️

 

“बावीस तारखेला ज्यावेळी रिझल्ट आला, तेव्हा आमच्या मावशीच्या दीराची बकरी कातरायची चालू होती. मी आणि मावसभाऊ तिथं खणातच होतो. पाच वाजता निकाल लागंल असं वाटत होतं. अडीच वाजता रिझल्ट आला. मित्राने कल्पना दिली की रिझल्ट लागलाय. त्यानंतर मग काही मिनिटं आनंदाश्रू आले. खूप भारी वाटलं. त्यानंतर दादाला वगैरे कल्पना दिली,” बिरदेव सांगतो.

बिरदेव धनगर समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला होतकरु आणि हुशार पोरगा. ही त्याची ओळख अगदी शाळेपासूनची!

बिरदेवला जेव्हा दहावीला 96 टक्के मार्क्स मिळाले. तेव्हा अतिशय छोट्या गावच्या पालावरच्या या पोराला मिळालेल्या यशाचं कौतुक तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्याच्या शाळेला कौतुकाचं एक पत्र पाठवून केलं होतं.

 

जाणून घ्या यशोगाथा video वायरल

➡️ इथे पहा विडियो ⬅️

 

बिरदेवनं आपला संघर्षमय प्रवास उलगडून सांगताना एका मुलाखतीत या किस्स्याचा उल्लेख केला.

राजेंद्र दर्डा यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून म्हटलंय की, “इतक्या वर्षांनी हा बिरदेव अचानक मला पुन्हा भेटला आहे, आणि तोही भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक महत्वाकांक्षी तरुण म्हणून! यूपीएससी परीक्षेत 551 वी रँक मिळवून उत्तीर्ण झाल्याची बातमी बिरदेवच्या मित्राने त्याला फोनवर सांगितली तेंव्हा बिरदेव शेतातच मेंढ्या चारत होता. ‘मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी क्रॅक केल्या’ची यशोगाथा सांगणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओत बिरदेवने माझी आठवण काढल्याचे मी पाहिले/ऐकले आणि खरं सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले. “

Leave a Comment