Home Loan EMI Calculation नमस्कार मित्रांनो आपण सध्याच्या स्थिती पाहिलं तर ग्रामीण भागात किंवा शहरी या दोन्ही भागांमध्ये जमिनी, रियल इस्टेट, फ्लॅट,प्लॉट याचबरोबर घर यांच्या किमती वाढतच आलेले आहेत आणि अशात जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर आपल्याकडे संपूर्ण पैसे नसले तरीही आपण घर घेऊ शकतो. पैसे नसताना घर घेण्यासाठी आपण होम लोन घेऊन घर घेऊ शकतो परंतु आता होम लोन घेतल्यानंतर प्रत्येक जणाला आपल्याला किती भरावा लागेल किती वर्ष भरावे लागेल.
याचे टेन्शन राहते तर तुम्ही कोणत्याही बँकेकडून होम लोन घेतल्यानंतर त्यावर किती एम आय भराव लागेल आपण घेतलेल्या लोन वर किती इंटरेस्ट द्यावा लागेल याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊया यामध्ये जर तुमचे बजेट किंवा होम लोन हे 50 लाख रुपयांचे असेल तर त्यावर तुम्हाला किती इंटरेस्ट द्यावा लागणार आहे आणि तुम्हाला महिन्याला किती इएमआय भरावा लागेल त्याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊया.
आपण पाहिले तर अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा या प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी लागतात यामध्येच आपण पाहिलं तर घर एक त्यातील एक महत्त्वाचा बाब आहे आणि आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे घर विकत घेणे ही सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी गोष्ट असते जे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत यांना आपली जीवनभराची सर्व कमाई गुंतवून घर घ्यावे लागते आजकाल आपण पाहिलं तर प्रॉपर्टी चे दाम हे खूप वाढत चाललेले आहेत.
परंतु यामध्ये पाहिलं तर या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य माणसाला घर घेणे खूप अवघड असते यामुळे घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन घर घेतात मात्र जे आपण घर घेण्यासाठी कर्ज घेतलेले आहे त्या कर्जावर तुम्हाला जास्त किती रक्कम भरावी लागते आणि ईएमआय किती येतो आणि हा किती वर्षे भरावा लागणार हा प्रश्न सर्वांना पडतो.
आता खाली तुम्हाला बँक ऑफ बडोदा चे जे होम लोन आहे याबद्दल तुम्ही जर 50 लाख रुपयापर्यंत होम लोन घेतले तर तुम्हाला महिन्याला किती एमआय भरावा लागेल आणि त्यावर तुम्हाला व्याज किती द्यावे लागेल याची संपूर्ण माहिती खाली जाणून घेऊया.
50 लाखाचे होम लोन घेतल्यानंतर किती EMI भरावा लागेल
जर आपण इंडिया मध्ये पाहिलं तर होम लोन हे तुम्हाला 8.25-12.50 टक्के या रेंजच्या इंटरेस्टवर भेटते. आणि यामध्येच बँक ऑफ बडोदा चे होम लोन विषयी पाहिलं तर तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून कोणतेही होम लोन हे 8.40% पर्यंत आहे हा इंटरेस्ट रेट तुमच्या सिबिल स्कोर नुसार चेंजही होऊ शकतो आणि जर तुम्ही 50 लाख रुपयांचे होम लोन घेणार तर तुम्हाला जे काही होम लोन आहे त्या होम लोन च्या दहा टक्के अमाऊंट हे डाऊन पेमेंट म्हणून भरावे लागत असते. जर तुम्ही 50 लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये हे डाऊन पेमेंट करून तुम्हाला 45 लाख रुपयांची होम लोन करावे लागणार आहे.
दरमहा किती इएमआय भरावा लागेल?
जर तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून 45 लाख रुपयांचे होम लोन केले आणि 30 वर्षाची फेड घेतली तर तुम्हाला महिन्याला 34 हजार 283 रुपयांचा इएमआय भरावा लागणार आहे. हे संपूर्ण एम आय भरल्यानंतर तुम्ही टोटल अमाऊंट हे 1 कोटी 23 लाख 41 हजार 770 रुपये इतके भरणार आहात म्हणजेच तुम्हाला 45 लाखाच्या केलेल्या होम लोन वर 78 लाख 41 हजार 770 रुपयांचा नुसता इंटरेस्ट द्यावा लागणार आहे.
कोणत्या बँकेचे होम लोन घ्यावे? कशी करावी निवड?
जर तुम्हाला कोणत्याही बँकेचे होम लोन घ्यायचे असेल किंवा तुम्हाला परवडणारे होम लोन घ्यायचे असेल तर होम लोन घेताना होम लोन विषयी संपूर्ण माहिती घ्यावी जसे की कोणत्या बँकेचे होम लोन इंटरेस्ट रेट हे कमीत कमी आहे याचबरोबर बँकेकडून आपल्या लोन वर कोणते हिडन चार्जेस लावले जात तर नाहीत ना आणि आपल्या सिबिलचा लोन इंटरेस्टेड वर काय परिणाम पडत आहे अशा सर्व बाबींची आधी माहिती घेऊन नंतर आपण होम लोन साठी विचारपूस करून होम लोन घेतले पाहिजे याने तुम्हाला परवडणारे होम लोन मिळू शकते.