महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा दहावीचा पेपर झाला लिक पेपरचे फोटो झाले वायरल

Board Exam Maharashtra News दहावी महाराष्ट्र बोर्डाची पेपर हे नुकतेच सुरू झालेले आहेत आणि या पेपर विषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि ती बातमी म्हणजे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर मध्ये असलेल्या एका परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरू असताना हा पेपर लीक झाल्याची बातमी आली आहे माहितीनुसार मराठी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळाने हा पेपर लीक झाला अशी माहिती मिळालेली आहे आणि काही वेळातच हा बदनापूर मधील सर्व सीसी सेंटरवर पोचला आणि याच्या फोटोकॉपी या वायरल झालेल्या आहेत.

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा मराठीचा पेपर सुरू असताना तो लिख झाल्याची बातमी ही मीडिया द्वारे पसरत आहे 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या पेपरांची प्राथमिक भाषां पासून सुरुवात झाली परंतु पेपर सुरू झाल्याच्या काही वेळाने हा मराठीचा पेपर लीक झाल्याची बातमी वायरल होत आहे. महाराष्ट्र मधील जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीचा मराठीचा बोर्डाचा पेपर सुरू असताना हा पेपर लिक झाल्याची बातमी आलेली आहे. या घटनेने राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा सुरक्षिततावर अनेक प्रश्न उठत आहेत.

या या आलेल्या बातमीनुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर मध्ये केंद्रावर मराठीचा पेपर सुरू असताना तो लेख झाला याची बातमी आलेली आहे सोशल मीडियावरील माहितीनुसार मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळाने हा लेख झाला आणि याच्या झेरॉक्स कॉपी काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या या सर्व घटनेने विद्यार्थी आणि शिक्षण विभागामध्ये गोंधळ झाला आहे.

कॉपीमुक्त अभियानावर मोठा प्रश्नचिन्ह?

यंदा आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासन याचबरोबर शिक्षण विभाग यांनी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावे यासाठी अनेक कठोर पावले उचलली होती. याचबरोबर परीक्षा केंद्रावर कडक देखरेख ठेवण्यात आली आणि पेपर फुटी सारख्या घटना रोखण्यासाठी अनेक उपयोजना देखील करण्यात आल्या होत्या अशा सर्व उपायोजना असून देखील प्रश्नपत्रिका फुटल्याने प्रशासनाने केलेल्या तयारीवर एक मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये झाला गोंधळ

ही पेपर फुटी ची बातमी समोर आल्यानंतर परीक्षा देणारे दहावीचे विद्यार्थी आणि याचबरोबर त्यांचे पालक यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेची चिंता असताना त्यांच्या पालकांना आपल्या पाल्याच्या परीक्षा वर काही परिणाम होणार नाही ना असा प्रश्नचिन्ह पडलेला आहे या झालेल्या घटनावर शिक्षण विभागाकडून आतापर्यंत कोणतीही अधिकृत स्टेटमेंट आलेली नाही परंतु या सर्व घटनेवर चौकशी करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभाग कारवाई करणार का? कोणावर केली जाईल कारवाई?

या पेपर फुटीच्या घटनेमुळे आता सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष शिक्षण विभागावर आहे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ही प्रश्नपत्रिका लिंक कशी झाली आणि यासाठी जबाबदार कोण असणार आहे परीक्षा केंद्रावर केलेल्या सुरक्षे मध्ये काही कमतरता होत्या की यामागे काही संघटित टोळी काम करत होती आता शिक्षण विभागालाच लवकरात लवकर निर्णय घेऊन याची चौकशी सुरू करू शकते आणि पेपर फुटी साठी जे कोणी दोषी आहेत यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment