महिलांसाठी नवीन योजना सुरू महिन्याला मिळणार 7000 रुपयांचा लाभ असा घ्या लाभ

LIC Sakhi Bima Yojana Apply नमस्कार महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून बऱ्याच योजना सुरू केल्या जातात आणि यातील बऱ्याच योजनांचा लाभ सध्या महिला घेत आहेत आणि यातच एक आनंदाची बातमी म्हणून महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एलआयसीमार्फत बीमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला सात हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे आणि यामध्येच जर महिलांनी चांगल्या प्रकारे काम केल्यानंतर त्यांना 48 हजार रुपयांचे बोनस सुद्धा दिले जाणार आहे.

तर चला जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कसा करता येणार आहे पात्रता काय असेल आणि याचबरोबर या योजनेअंतर्गत अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काम काय करावे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेऊया.

एलआयसी सखी विमा योजना नक्की आहे तरी काय?

तर ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत महिलांनी अर्ज केल्यानंतर महिलांना तीन वर्षाचे टाईपेंड सोबत एलआयसी एजंट बनण्याची ट्रेनिंग दिली जाणार आहे देशातील सर्वात मोठी लाइफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे एलआयसी या एलआयसीच्या माध्यमातून केंद्र सरकारने भीमा सखी योजना ही लॉन्च केली आणि ही महिलांमध्ये सुपरहिट झाली आणि महिला यासाठी अर्ज देखील करत आहेत याचा अंदाज तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या पाहून लाऊ शकता.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या पाहिली तर ही योजना लॉन्च होताच एका महिन्याच्या आत मध्ये जवळजवळ 50 हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत ही योजना केंद्र सरकारकडून चालू करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सशक्त व्हाव्या असे होते. या योजनेची खास बात म्हणजे या योजनेची ट्रेनिंग सुरू झाले कीच महिलांना कमाई सुरू होत आहे तर चला महिलांना किती लाभ मिळणार आहे आणि कसा अर्ज करावा याची सविस्तर माहिती पाहूया.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना केली लॉन्च

या योजनेविषयी माहिती पाहिली तर गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर महिन्यात नऊ तारखेला 2024 यासाठी ही योजना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च केली गेली योजना सुरू होताच एक महिन्याभरातच महिलांचा चांगला रिस्पॉन्स मिळून या योजनेसाठी एकच महिन्यामध्ये तब्बल 52511 इतक्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता आणि या महिलांपैकी 27 हजार महिलांना या योजनेअंतर्गत नोंदणी कम्प्लीट झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर सुद्धा पाठवण्यात आले होते.

ट्रेनिंग सोबतच तुमची होणार कमाई सुरू

याला असे अंतर्गत सुरू केलेल्या या भीमाशखी योजनेचे महिलांना अनेक फायदे आहेत त्यामुळे एक योजना खास ठरत आहे या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिला नोंदणी करणार आहेत किंवा अर्ज करणार आहेत अशा महिला या सशक्त होण्यासाठी या योजनेअंतर्गत ट्रेनिंग दिली जाते आणि या ट्रेनिंग देतानाच त्यांना त्यांच्या महिन्याला पगार दिला जातो आपण पाहिलं तर भीमा सखी योजना या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी चे एजंट बनण्याची संपूर्ण ट्रेनिंग दिली जाते.

याचबरोबर ही ट्रेनिंग सुरू असताना दर महिन्याला पाच हजार ते सात हजार रुपये पर्यंत लाभ दिला जातो या योजनेअंतर्गत ट्रेनिंग घेणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी दर महिन्याला सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी दर महिन्याला सहा हजार रुपये आणि शेवटचे म्हणजेच तिसऱ्या वर्षी दर महिन्याला पाच हजार रुपये असे मासिक वेतन दिले जाते आणि या ट्रेनिंग मध्ये जर महिलांनी आपले दिलेले टार्गेट कम्प्लीट केले तर त्यांना कमिशन म्हणून बेस्ट इन्सेंटिव्ह सुद्धा देण्याची सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेली आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्याची सर्वात सोपी पद्धत :-

बिमा सखी योजनेसाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या एलआयसी ब्रांच मध्ये जाऊन अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे वयाचा दाखला रहिवासी दाखला दहावीचे परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि याच बरोबर तुम्ही अटेस्टेड असल्याची कॉपी अशी कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे :-

सर्वात आधी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे या वेबसाईटवर जाण्यासाठी गुगल वर जाऊन “एलआयसी भीमा सखी योजना” असे सर्च करा सर्च केल्यानंतर पहिलीच तुम्हाला एलआयसी ची वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटची पेज ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला बिमा सखी अप्लाय ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

या लिंक वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज होऊन तिथे एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये दिलेली जी गरजेची माहिती आहे ती संपूर्ण भरायची आहे.

संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर एकदा संपूर्ण माहिती चेक करा आणि नंतर खाली दिलेल्या कॅपच्या भरून तुमचा फॉर्म सबमिट करा.

Leave a Comment