महिलांसाठी आनंदाची बातमी होळीनिमित्त रेशन सोबत मिळणार मोफत साडी गिफ्ट

Free Sadi Gift Yojana महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती बातमी म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि यानंतरच आता होळीनिमित्त राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार आता महिलांना रेशन सोबत मोफत साडी दिली जाणार आहे तर चला जाणून घेऊया ही साडी कोणत्या महिलांना दिली जाणार आणि ही साडी घेण्यासाठी तुम्हाला कुठे मिळणार आहे इथे पहा संपूर्ण माहिती.

राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतात राज्य यंत्रमाग महामंडळाकडून जे कोणी अंत्योदय रेशन कार्ड धारक आहेत अशा रेशन कार्ड धारकांची यादीनुसार जे साड्यांचे गठ्ठे आहेत हे प्रत्येक तालुक्यानुसार या रेशन कार्ड धारकाच्या कुटुंबातील महिलांना लाभ देण्यासाठी पोहोचवले जाणार आहेत. आपण जर पाहिलं तर जे महायुती सरकार आहे यांनी लाडक्या बहिणीवर लक्ष केंद्रित करून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ सुद्धा देण्यात येत आहे. याचबरोबर आपण पाहिलं तर महिलांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून अर्ध्या तिकिटावर प्रवास ही सुद्धा योजना सुरू करण्यात आली होती. अशा योजनांची महिलांसाठी पूर्णपणे अंमलबजावणी करून महिलांना पुरेपूर लाभ राज्य सरकारने दिलेला आहे.

मग आता यात महिलांना आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन होईन निमित्त रेशन दुकानात महिलांना मोफत साडीवाटप केले जाणार आहे. आणि या निर्णयानुसार आपण पाहिलं तर राज्य सरकार जे मोफत साडी वाटप करणार आहे यासाठी जे अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंब आहेत अशा कुटुंबातील महिलांना ही मोफत साडी वाटप केले जाणार आहे आणि हे मोफत साडी वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने त्यासाठी आदेश देखील काढलेले आहेत.

महिलांपर्यंत मोफत साडी योजनेचा लाभ देण्यासाठी आदेश जाहीर

आता राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतरच लगेच राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे जे कोणी अंत्योदय रेशन कार्डधारक आहेत अशा सर्व कुटुंबांची यादी काढून जेवढे कुटुंबातील महिला पात्र ठरणार आहेत त्यांच्यासाठी साड्यांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे यामध्ये या अंत्योदय रेशन कार्ड धारकाच्या यादीनुसार प्रत्येक तालुक्यानुसार साड्यांचे गठ्ठे हे पोहोचवण्यात येणार आहेत आणि पाहिलं तर जे पात्र कुटुंब ठरणार आहेत या प्रत्येक कुटुंबाला होळीच्या आधी एक एक साडी महिलांसाठी दिली जाईल.

मोफत साडीचा लाभ कसा दिला जाणार?

जर तुम्हाला मोफत साडीचा लाभ घ्यायचा असेल तर ज्या महिला या रेशन कार्ड नुसार पात्र असतील अशा महिलांना रेशन दुकानात जाऊन तुमचा ई पोस्ट मशीनवर अंगठा देऊन प्रत्येक अंत्योदय रेशन कार्ड धारकाला एक एक साडी दिली जाणार आहे.

मोफत साडी कोणत्या महिलांना मिळणार?

आता आपण पाहिलं तर ह्या मोफत साडी लाभ ही जळगाव जिल्ह्यातील 1 लाख 35 हजार 302 महिलांना दिला जाणार आहे. ही संख्या जळगाव जिल्ह्यातील जे अंत्योदय रेशन कार्डधारक आहेत अशा कुटुंबांची आहे. आणि या संख्येनुसार प्रत्येक तालुक्यानुसार साड्यांचा पुरवठा हा होळी सनापूर्वी केला जाणार आहे. आणि फक्त जे पात्र कुटुंबातील महिला आहेत या महिलांनी आपला अंगठा रेशन दुकानात जाऊन देऊन मोफत साडीचा लाभ घ्यायचा आहे.

Leave a Comment