अटी आणि शर्ती काय?

मुलांना काही बँकांमध्ये जास्तीत जास्त १,००,००० रुपये शिल्लक आणि किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. या खात्यांमध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध नाही.
मूल १८ वर्षांचं झाल्यावर केवायसी अपडेट आणि स्वाक्षरी अनिवार्य आहे.
पालक नियमितपणे अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवू शकतात. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा ठरवू शकतात.
मुलांना सुरक्षित बँकिंगचे नियम शिकवले पाहिजेत. पिन किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.