या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपले बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाशी जोडलेले आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या पीक विम्याची स्थिती ऑनलाइन किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तपासून घ्यावी. या मदतीसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे सरकारी संकेतस्थळांना भेट देणे गरजेचे आहे.

भरपाईचे तपशील आणि शासनाची भूमिका :-

मागील हंगामातील पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे, याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. खरीप हंगाम 2024 मधील भरपाईसाठी शासनाने विमा कंपन्यांना आवश्यक निधी दिला आहे. तसेच, 2022 पासून प्रलंबित असलेल्या भरपाईसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे खरीप आणि रब्बी 2022-23, खरीप 2023, रब्बी 2023-24 आणि खरीप 2024 या हंगामांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.